Amit Shah : गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी करणार नाशिक दौरा; घेणार त्र्यंबकराजाचे दर्शन!

  185

नाशिक : गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे शुक्रवारी २४ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार असून त्यांची सहकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.



गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी विमानतळावर आगमन होणार असून बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते त्र्यंचककडे प्रस्थान करणार आहेत. त्त्यानंतर १२ वाजून २० मिनिटांनी त्र्यंबक येथील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरेल, तेथून ते मोटारीने त्र्यंबके वर मंदिराकडे प्रस्थान करतील. साडेबाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात आगमन होणार असून त्याठिकाणी ते त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजन करणार आहेत. मंदिरातील पूजेसाठी वीस मिनिटांचा कालावधी आरक्षित असणार आहे. त्यानंतर दुपारी एकला ते हलिकोप्टरने मालेगावकडे स्वाना होतील.


दुपारी दोनला गृहमंत्री शाह (Amit Shah) हे मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील वेंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह फर्मला भेट देणार आहेत. याठिकाणी सहकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीनला बीएसएफच्या हेलिकॉप्टरने ते ओझर विमानतळावरून वीएसएफच्या विमानाने मुंबईकडे परततील.

Comments
Add Comment

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या