मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे.आज(२१ जानेवारी) पुण्यातील तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून पुढील काही दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात आज(२१ जानेवारी) रोजी आकाश मुख्यतः निरभ्र असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता असून पुणेकरांना पुन्हा एकदा गारठा जाणवणार आहे.काही भागात गारठा कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात १-३ अंशांनी घट झाली आहे.
दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचे सांगितले आहे.राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून सध्या श्रीलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. हे चक्राकार वारे सध्या राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात चढ – उतार होत आहे.त्यामुळे तापमानात बदल होत असून राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान होते.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…