वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आज २० जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत. पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौर्याबाबत सल्लागारांशी चर्चा केली असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. ही भेट एप्रिलच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या शेवटी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाइट हाऊसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्याच्या विचारावरही ट्रम्प कार्य करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित केला जाऊ शकतो.
ट्रम्प यांनी चीनवर जास्तीचे शुल्क लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले होते.मात्र, ट्रम्प आता चीन-अमेरिका संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहेत आणि यासाठी त्यांनी चीन दौर्याचा विचारही सुरू केला आहे.
भारत आणि चीन दौऱ्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि जागतिक स्थिरतेसाठी या दौऱ्यांना महत्त्व दिले जात आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…