Maharashtra Election Commission : दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त!

  105

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. ते पुढील पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही.


मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे.



अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २४३-के व अनुच्छेद २४३-झेडए आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्राचे राज्यपाल, श्री. दिनेश टी. वाघमारे यांची, दिनांक २० जानेवारी, २०२५ पासून किंवा त्यानंतर ते ज्या तारखेला कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार घेतील, त्या तारखेपासून राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करीत आहेत. श्री. दिनेश टी. वाघमारे हे सदर पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांकरीता हे पद धारण करतील आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती ह्या राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील तरतुदीनुसार असतील. राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील.

Comments
Add Comment

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै