Republic Day : प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

  93

सातारा :  यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी. प्रजासत्ताकदिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावेत. यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.



प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. पालकमंत्री देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत एकट्या सातारा जिल्ह्यात ८ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. २६ जानेवारीला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा. या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे त्याचे फोटो असणाराही चित्ररथ तयार करावा. कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयाशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताकदिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील फिरवावे. शासकीय इमारतींसह शिवतिर्थ, राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अशाच पद्धतीने काम करा, असेही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची