Captain: ऋषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेकडे या संघाचे नेतृत्व

  61

मुंबई: अजिंक्य रहाणेला कर्णधारपद मिळाले आहे. आयपीएल २०२५ च्या सुरूवातीआधी रहाणेला मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. रहाणेच्या नेतृत्वात १७ सदस्यीय संघात रोहित शर्माचीही निवड करण्यात आली आहे. मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू अँड काश्मीरशी पुढील सामना खेळायचा आहे.


आजच विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आता रहाणे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जायसवाल आणि शार्दूल ठाकूर असताना रहाणेकडे नेतृत्व देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहाणेला कोलकाता नाईट राडयडर्सचे नेतृत्वही मिळू शकते.



१० वर्षांनी रणजी खेळणार रोहित, १७ वर्षांनी होणार हे


आता हे निश्चित झाले आहे की रोहित शर्मा १० वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. रोहितलाही १७ सदस्यी संघात निवडण्यात आले आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरंतर, १७ वर्षांनी एखादा भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. याआधी असे सौरव गांगुलीने केले होते. तेव्हा दादा कर्णधार असताना रणजी सामने खेळला होता.



रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीसाठी मुंबईचा संघ


अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस और कर्ष कोठारी.



ऋषभ पंत बनला लखनऊचा कर्णधार


ऋषभ पंत आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असेल. गेल्या हंगामापर्यंत केएल राहुल लखनऊचा कर्णधार होता. मात्र त्याने आयपीएल २०२५च्या लिलावाआधी रिलीज केले होते. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात ऋषभ पंतसाठी ऐतिहासिक बोली लावली होती. लखनऊने या विस्फोटक फलंदाजाला २७ कोटी रूपयांना खरेदी केले होते.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब