IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी सामना होणार होता. मात्र आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.



आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.



काय म्हणाले सुनील गावस्कर ?


या सर्व प्रकरणावर बोलतांना सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान लवकरच 'यू-टर्न' घेईल असे सांगितले. "मला असं वाटतं की पुढील चार-पाच दिवसांत, जेव्हा संपूर्ण जगभरातून आणि पाकिस्तानच्याच माजी खेळाडूंच्याही प्रतिक्रिया येतील तेव्हा पाकिस्तान नेहमीप्रमाणे यू-टर्न घेईल. यात नवीन काय आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की पाकिस्तानचे क्रिकेटपटू निवृत्त होतात आणि नंतर चार दिवसांनी ते आपली निवृत्ती मागे घेतात आणि म्हणतात की 'आमच्या चाहत्यांनी आम्हाला अधिक खेळायला सांगितले'. हे पुन्हा घडू शकते,मात्र जर त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला तर आयसीसीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी." अशा शब्दांमध्ये सुनील गावस्कर यांनी आपले मत मांडले.

Comments
Add Comment

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात