मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद आलियान उर्फ बीजेला ठाण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आलियान हा तोच व्यक्ती आहे ज्याने १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता.
Maharashtra | Police has arrested the accused in the Saif Ali Khan attack case from Thane: Mumbai Police pic.twitter.com/fjfqPteXua
— ANI (@ANI) January 18, 2025
बारमध्ये हाऊसकिपींगचे काम करत होता
आरोपीची ओळख मोहम्मद आलियान उर्फ BJ अशी झाली आहे. पकडल्यानंतर पोलिसांच्या समोर त्याने मान्य केले की सैफ आणि करीनाच्या घरात घुसून त्याने हल्ला केला होता. मुंबई पोलिसांच्या टीमने त्याला ठाण्यातील लेबर कँप परिसरातून अटक केली. आरोपी ठाण्याच्या बारमध्ये हाऊसकिपींग वर्कर म्हणून काम करत होता.
वाचण्यासाठी सांगितले खोटे नाव
विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याला पकडण्यात यश मिळाले. पोलिसांकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाण्यात पकडलेला हा आरोपी वाँटेड होता. आता वांद्रे येथे त्याची चौकशी केली जाईल.
हल्लेखोराने आपला जीव वाचवण्यासाठी आपले खोटे नाव विजय दास असे सांगितले होते. हल्लेखोर अटक होण्यापूर्वी सैफ अली खानच्या घराचे जिने उतरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्याचे पोस्टर मुंबई आणि जवळच्या ठिकाणावर लावले होते.