मुंबई : सैफ अली खानवर बुधवारी रात्री बाराव्या मजल्यावर घुसून एका अज्ञात इसमाने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असून सैफची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Tadoba Chandrapur : ताडोबातील ‘त्या’ गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
मात्र सैफच्या घरी घुसून हल्ला करणारा हल्लेखोर दोन दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्यांपैकी आहे असा पोलिसांचा संशय आहे. भिंतीवर जाळी असल्याने चोर शाहरुखच्या घरात घुसू शकला नाही. दरम्यान सैफ अलीखानच्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.