मुंबई : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर आधी वांद्रे स्टेशन जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि नंतर दादर मध्ये दिसला. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. पोलिसांची एक तुकडी दादरमध्ये तपास करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Walmik Karad Update : वाल्मिक कराडच्या जामिनाबाबत आज केज न्यायालयात सुनावणी
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. काल (दि १७ ) रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून २. ५ इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर सैफच्या राहत्या इमारतीत एका कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर तो वांद्रे स्टेशनवर बदलेल्या कपड्यांमध्ये दिसून आला. अशातच काल त्याने कबुतरखानाजवळील एका मोबाईलच्या दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या हल्ल्याबाबत पोलिसांचा वेगाने तपास सुरु असला तरी दोन दिवस उलटूनही हल्लेखोर कधी पकडला जाईल याकडे सैफच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.