Mahavitaran : रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीला चालना

पंतप्रधान सूर्य घरयोजनेला रायगड जिल्ह्यात वाढता प्रतिसाद


रायगडमध्ये ९८० लाभार्थ्यांनी घेतला लाभ


अलिबाग : पंतप्रधान सूर्य घर योजनेला रायगड जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सौर ऊर्जेतून ३ हजार ३३५ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, २ हजार ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, महावितरणच्या भांडुप परिमंडल विभागात रायगडचा पेण विभाग अव्वल आहे.


पंतप्रधान सूर्य घर मोफत वीजयोजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. यात रायगड जिल्ह्यातील पेण परिमंडलातील ९८० ग्राहकांचा समावेश आहे. अजून दोन हजार अर्ज शिल्लक असून, उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.



विजेचे वाढणारे दर आणि त्यामुळे मासिक वीज बिलात होणारी वाढ ही ग्राहकांसाठी कायमच चिंतेची बाब राहिली आहे. मात्र, वाढत्या वीज बिलांपासून सौर ऊर्जा निर्मितीतून सुटका करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीज बिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वाढत्या वीज बिलांपासून सुटका होण्यास या योजनेमुळे मदत होत आहे.


या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रतिकिलोवॉट ३० हजार रुपये


अनुदान २ किलोवॉटपर्यंत मिळते. ३ किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॉटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रतिकिलोवॉट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॉट आहे. महावितरणतर्फे रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॉटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्य घर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.
वीज ग्राहकांनी https:// www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून, सर्व सुविधा ऑनलाइन व पेपरलेस उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण