Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Highway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुविधा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग...

Mumbai Highway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुविधा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग…

आगीत बस जळून खाक; ३० प्रवाशी बालबाल सुदैवाने बचावले….

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सुविधा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर या बस मधील ३० प्रवाशी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मुबंईहुन लोणावळाकडे सुविधा ट्रॅव्हलची बस क्रमांक (MH 47 AS 0779) ही चालक असिफ केनिया (रा दहिसर मुबंई ) ही बस मीरारोड येथून लोणावळाकडे ३० प्रवाशी घेऊन जातं असताना बस बोरघाटात दत्तवाडी जवळ आली असता शॉर्टसर्किटमुळे बसच्या इंजिनला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे,तर चालकाच्या तत्परतेने बस थांबवून प्रवाशी आणि बस मधील सामान बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली नगरपालिका अग्निशमन बंब, आयआरबी अग्निशमन दल, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्थिने प्रयत्न केले…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -