सोलापूर : बनावट आधारकार्ड तयार करून अवैधरीत्या भारतात प्रवेश करून बार्शीतील पंकजनगर येथे राहत असलेल्या पाच बांगलादेशी (Bangladeshi) महिलांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस निरीक्षक सोनप जगताप यांनी पंकजनगर परिसरात बांगलादेशी नागरिकाकडून घुसखोरी व बनावट दस्तऐवज याच्या वापरासंदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही दहशतविरोधी पथक सोलापूर युनिट व बार्शी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
चौकशीत त्यांच्याकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रोख रक्कम १ लाख ४१ हजार रुपये रोख, ४६ हजारांचे मोबाइल, बनावट आधारकार्ड, बांगलादेशी कागदपत्रे मतदान कार्ड हे जप्त करण्यात आले. याप्रकरणी नजमा यासिन शेख (३३), रेहना बेगम समद शिकदर (३३), आरजिना खातून अनवर शेख (१६), शिखा शकीब बुहिया २३, शकीब बादशाह बुहिया (२३), शोएब सलाम शेख (२४) बांगलादेशीय पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. तर, याच्या चौकशीत येथील पंकजनगर येथे वास्तव्य करण्यास मदत करणारे बार्शी येथील विशाल मांगडे, राणी पूर्ण नाव माहीत नाही व किरण परांजपे या सर्वांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…