Thane News : वाहतूक, दळण-वळण प्रकल्पांची उभारणी सुरू!

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळण-वळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. तसेच अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी समस्याविषयांवर सविस्तर चर्चाही केली.




  • बदलापूर - कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करणे.

  • कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.

  • कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील 'यू टाईप' रस्त्यांना गती देण्यात यावी.

  • उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.

  • कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना केली.

Comments
Add Comment

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती