Narayan Rane : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर

खा. नारायण राणे "मराठा गौरव", तर उज्ज्वल तावडे "कुलभूषण"


मुंबई : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या (मुंबई) वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मराठा गौरव पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांना जाहीर झाला असून येथे १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तावडे समाज कुलभूषण पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ शिक्षणमहर्षी उज्वल जयवंतराव तावडे यांना जाहीर झाला असून त्याचे वितरणही याच कार्यक्रमात होणार असल्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव हिरोजी तावडे यांनी जाहीर केली आहे. दादर पश्चिमेतील डॉ. अँटोनियो डिसिल्वा हॉलमध्ये १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार ते आठ या कालावधीत या कौटुंबीक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांची असणार आहे.



याचवेळी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार चंद्रशेखर श्रीधर तावडे (वाडा), बाळकृष्ण रघुनाथ तावडे (वाल्ये), उदय पांडुरंग तावडे (वाल्ये) यांना जाहीर झाला असून कृषी पुरस्कार विवेक विश्वनाथ तावडे (वाडा), राजेश परशुराम तावडे (नाधवडे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. उद्योजक पुरस्कार : स्नेहा अनिल तावडे (नाटळ), क्रीडा : रिधान सुनील तावडे (देवधामापूर), ठाणे येथील स्टेशन मास्तर केशव सदानंद तावडे (वाल्ये), आशा स्वयंसेविका : अनुश्री अनंत तावडे, एसीपी महेश रमेश तावडे, डाक पोस्ट कार्यालय उपअधीक्षक सौ. मनाली राजेंद्र तावडे, डाक पोस्ट कार्यालय सहाय्यक उपअधीक्षक प्रफुल्ल महादेव तावडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.


२०२४ च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तावडे कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. कौटुंबिक जिव्हाळा वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सरचिटणीस सतीश तावडे यांनी यावेळी दिली असून तावडे कुटुंबीयांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल