Harsha Richhariya : सुंदर साध्वीचा महाकुंभ सोडून जाण्याचा निर्णय पक्का!

प्रयागराज : ह्यावर्षी महाकुंभ मेळाव्यात लाखो भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेकांनी पवित्र स्नान देखील केलं. या महाकुंभ मेळाव्यात काहीजण चर्चेचा विषयही ठरले आहेत. त्यातील एक हर्षा रिछारिया हे नाव जोरदार चर्चेत आहे. हर्षा रिछारियाला सोशल मीडियावर सर्वात सुंदर साध्वीचा टॅगही देण्यात आला आहे. कुंभमधील ३० वर्षीय हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सर्वांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशातच प्रत्येक लहान-मोठ्या माध्यमांनी तिची मुलाखत घेतली ज्यामध्ये तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला? असे विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने ती साध्वी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.



महाकुंभात प्रवेश करताना हीच देखणी साध्वी आराखड्याच्या रथावर बसलेली दिसली. यावरून काहींनी प्रश्न निर्माण केले होते. काही संतांनी हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि भगवे कपडे परिधान करण्यावर आक्षेप घेतला. हा वाद इतका वाढला आहे की, हर्षा रिछारियाने ढसाढसा रडत महाकुंभ सोडण्याची घोषणा केली आहे.





हर्षाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, " जी मुलगी या पवित्र कुंभामध्ये धर्माशी जोडून घेण्यासाठी, धर्म जाणून घेण्यासाठी सनातन संस्कृती जाणून घेण्यासाठी इथे आली तिला तुम्ही संपूर्ण कुंभ मेळाव्यात राहण्याच्या स्थितीतही सोडलं नाही. पाप पुण्याचं मला माहित नाही, पण आनंद स्वरूपजींनी जे काही केलं त्याचं पाप त्यांना नक्कीच लागेल. तुम्ही हा पवित्र कुंभ माझ्याकडून हिसकावून घेतला आहे. तो कुंभ जो आपल्या आयुष्यात एकदाच येतो. माझी नेमकी चूक काय आहे?, मला टार्गेट केलं जात आहे. अशा परिस्थितीत, २४ तास या कॉटेजला पाहण्यापेक्षा मी येथून निघून जाणं माझ्यासाठी चांगलं आहे."

Comments
Add Comment

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव