मुंबई : गुजरातमध्ये होणाऱ्या कोल्डप्लेची (Coldplay Concert) घोषणा होताच देशभरातील अनेक संगीतप्रेमींचा उत्साह गगनाला भिडत चालला होता. अशातच गुजरात कोल्डप्ले कॉन्सरच्ला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता पश्चिम रेल्वेने (Western Railway) आनंदाची बातमी दिली आहे. पश्चिम रेल्वे गुजरात कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन (Special Train) सोडणार आहे. त्यामुळे गुजरात येथील कोल्डप्ले कॉन्सर्टला जाणाऱ्यांसाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे.
Pune Accident : ३ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; ९ जण जागीच ठार!
कसे असेल वेळापत्रक?
- मुंबई ते अहमदाबाद विशेष रेल्वे गाड्या २५ आणि २६ जानेवारी रोजी चालवण्यात येणार आहेत. पहिली ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून दुपारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहचेल. तर परतीची ट्रेन रेल्वे मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
- तर दुसरी ट्रेन २७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथून सुटणार आहे आणि सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. या ट्रेन बोरीवली, वापी, उधना, सूरत, भरूच, वडोदरा आणि गरतापुर या स्थानकांवर थांबेल.
दरम्यान, कोल्डप्ले कॉन्सर्टवेळी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विशेष लोकल सोडण्याचे नियजन केले आहे. या दोन्ही विशेष रेल्वेची तिकिटे बुक माय शो द्वारे बुक करता येणार आहे.
नवी मुंबईतील कोल्डप्लेसाठी विशेष रेल्वे
रेल्वे प्रशासनाने नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियम येथे होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी देखील विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. नवी मुंबईत १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी होणारे या कॉन्सर्टसाठी गोरेगाव ते नेरुळ स्थानकादरम्यान धावणार आहेत. या लोकल फक्त कोल्डप्ले सभासदांसाठीच असणार आहेत.