मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडला. यंदा सुमारे ८२ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासन, पोलीस दल, बेस्ट आणि अन्य यंत्रणांच्या मदतीने हा उत्सव साजरा होऊ शकला. २०२५ सालचा गणेशोत्सवही इतक्याच धुमधडाक्यात व्हायला हवा. पण, प्रत्येक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव स्पर्धा – २०२४’ पुरस्कारांचे वितरण महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात अत्यंत थाटात आणि उत्साहात हा सोहळा पार पडला. परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा -२०२४ अंतर्गत प्रशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (परिमंडळ-२ ) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) तथा सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांच्या हस्ते शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांचे सहायक आयुक्त, विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी मुंबई महानगरातील सार्वजनिक मंडळांसाठी श्री गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये पर्यावरण, रस्ते अपघात, मराठी भाषा, मतदान, आरोग्य, अवयवदान आदी विषयांवर अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे सर्वोत्कृष्ट मंडळ, विविध सामाजिक उपक्रमांचे अभिनव पद्धतीने आयोजन करणाऱ्या मंडळांना पुरस्कार दिला जातो. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार, सर्वोत्कृष्ट मूर्तीकारांना गौरविले जाते. तसेच सर्वोत्कृष्ट तीन मंडळांनाही पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
प्रास्ताविकात उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान तसेच श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान आवश्यक विविध सोयीसुविधा पुरविल्या जातात. शाडू मातीची मूर्ती, कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन आदी उपक्रमांमुळे हा उत्सव अधिक चांगला झाला. सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने सुरुवात केली आणि आगामी काळात ती अधिक वाढीस लागो, ही अपेक्षा आहे.
दरम्यान, श्री गणेश गौरव स्पर्धा-२०२४ मध्ये विविध प्रकारांतील विजेते श्री गणेश मंडळ तसेच वैयक्तिक पुरस्कारार्थींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. सदर पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे-
प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सातबंगला, अंधेरी (पश्चिम)
द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, बावला मस्जिद, करीरोड (पश्चिम)
तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
युवक उत्कर्ष मंडळ, गेट नंबर ०६, मालवणी, मालाड (पश्चिम)
सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु. २५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
श्री. पंकज मेस्त्री यांना साईविहार विकास मंडळ, भांडूप पश्चिम येथील मूर्तीसाठी
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
श्री. सुमित पाटील यांना शिवाजी पार्क हाऊस गणेश मंडळ, दादर (पश्चिम) येथील सजावटीसाठी
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
नवतरुण मित्र मंडळ, कोकणी पाडा, गावदेवी नगर, दहिसर (पूर्व)
बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम)
शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु. २५,०००/-, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र)
श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, अंधेरी (पूर्व)
प्लास्टिक बंदी / थर्माकोल वंदी / पर्यावरणविषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः
(प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग, माझगाव
सामाजिक कार्य / समाज कार्य / अवयवदान जागृतीः पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार, गिरगाव
प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळ
समाज प्रबोधन
विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ, बोरिवली (पूर्व)
शिवगर्जना तरूण मित्र मंडळ, अंधेरी (पूर्व)
साईदर्शन मित्र मंडळ, बोरिवली (पश्चिम)
व्यसनमुक्ती प्रबोधन
अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, सिद्धीगणेश, घाटकोपर (पश्चिम)
मतदानविषयक जनजागृती (लहान मुलांनी केलेली सजावट)
इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धाराशिव मंदिर, धारावी
सामाजिक उपक्रम
गोकुळगनर सार्वजनिक मंडळ, दहिसर (पूर्व)
मराठी भाषा प्रबोधन
हनुमान सेवा मंडळ, धारावी
रस्ते अपघात व जनजागृती
बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (पश्चिम)
सुबक शाडू मूर्ती
श्री. श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर पूर्व
पर्यावरणविषयक जनजागृती
ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर (पूर्व)
परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा -२०२४
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ
उप आयुक्त (परिमंडळ – १) – डी विभाग – स्थळ : गिरगाव चौपाटी
उप आयुक्त (परिमंडळ – २) – जी/उत्तर विभाग – स्थळ : एम. बी. राऊत मार्ग व माहिम रेती बंदर चौपाटी
उप आयुक्त (परिमंडळ – ३) – के/पूर्व विभाग – स्थळ : लोकमान्य टिळक (शाम नगर) तलाव
उप आयुक्त (परिमंडळ – ४) – के/पश्चिम विभाग – स्थळ : जुहू समुद्रकिनारा
उप आयुक्त (परिमंडळ – ५) – एम/पश्चिम विभाग – स्थळ : चरई तलाव, हेमू कलानी मार्ग, चेंबूर
उप आयुक्त (परिमंडळ – ६) – एस विभाग – स्थळ : पवारवाडी घाट, पवई तलाव
उप आयुक्त (परिमंडळ – ७) – आर/मध्य विभाग – स्थळ : गोराई जेट्टी, बोरिवली (पश्चिम)
सर्वोत्तम कृत्रिम विसर्जन स्थळ
उप आयुक्त (परिमंडळ – १) – ए विभाग – स्थळ : भारताचे प्रवेशद्वारे (गेट वे ऑफ इंडिया)
उप आयुक्त (परिमंडळ – २) – जी/उत्तर विभाग – स्थळ : क्रीडा भवन
उप आयुक्त (परिमंडळ – ३) – एच/पूर्व विभाग – स्थळ : चेतना महाविद्यालय शेजारी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे (पूर्व)
उप आयुक्त (परिमंडळ – ४) – के/पश्चिम विभाग – स्थळ: लल्लुभाई पार्क, विलेपार्ले (पश्चिम)
उप आयुक्त (परिमंडळ – ५) – एल विभाग – स्थळ : वस्ताद लहुजी साळवे मैदान, विजय फायर मार्ग, चांदिवली
उप आयुक्त (परिमंडळ – ६) – एन विभाग – स्थळ : आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व)
उप आयुक्त (परिमंडळ – ७) – आर/दक्षिण विभाग – स्थळ : महाराणा प्रताप उद्यान लोखंडवाला, कांदिवली (पूर्व)
उप आयुक्त (परिमंडळ – ७) – आर/उत्तर विभाग – स्थळ : युनिव्हर्सल शाळेच्या खेळाच्या मैदानासमोर अशोकवन, दहिसर (पूर्व)