मुंबई : लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी कारवाई करण्यात आली. त्यामुळे पदपथ, रस्ता मोकळा झाला असून एक प्रकारे लोअर परळ वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग हद्दीतील गणपतराव कदम मार्गावर व्यावसायिक दुकानदार, गाळेधारकांनी वाढीव बांधकाम, अनधिकृत शेडस् उभारल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिले होते. त्यानुसार जी दक्षिण विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन, देखभाल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे अभियंते, १२ कामगार, दोन मालट्रक आणि पोलीस दलाच्या मदतीने ही कारवाई पार पडली.
BMC : नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी नियोजन करा, आयुक्तांचे निर्देश