खानिवली-कुडूस मार्ग बनला मृत्यूचा सापळा

खासगी कंपनीसाठी केबल टाकण्याचे काम सुरू


वाडा : कंचाड-खानिवली-कुडूस रा. प. म. ४३ मार्गालगतच खोदकाम करून केबल टाकण्याच्या नावाखाली मार्ग जागोजागी खोदून टाकल्याने रस्त्यावर अनेक अपघात होत असून हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. कंचाड-खानिवली-कुडूस या मार्गावरील भावेघर येथे असलेल्या वीज वितरणच्या फिटरवरून ते कुडूस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोका कोला कंपनीच्या फिटरपर्यंत ही केबलची लाईन टाकली जात आहे.


एका खासगी कंपनीसाठी ही केबल टाकण्याचे काम सुरू आहे. एका ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला असून त्यांने बांधकाम रस्त्यालगतच शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही लाईन टाकली जात असल्याने यामुळे डांबरी रस्त्याचा दीड मीटरचा संपूर्ण पट्टा उखडून टाकला गेला आहे. या ठिकाणी खाेदल्यामुळे येथे अपघात घडत आहेत.


याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची असून त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील नागरिक सुभाष हरड यांनी केली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानग्या घेऊनच ही लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल ती त्यांनी लेखी स्वरूपात द्यावी. - अविनाश कटकवार, उप अभियंता वीज वितरण वाडा


उपअभियंतामार्फत या रस्त्याची पाहणी करून या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ. - नितीन भोये, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार

Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका