पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, नौदलाच्या तीन नौकांचे राष्ट्रार्पण

मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी १५ जानेवारी रोजी पहिल्यांदा मुंबईत येत आहेत. याआधी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी निमित्त मुंबईत आले होते. पंतप्रधान यावेळच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील. तसेच नौदलाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असतील. या कार्यक्रमात नौदलाच्या एक फ्रिगेट, एक विनाशिका आणि एक पाणबुडी अशा तीन नौकांचे राष्ट्रार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत सकाळी आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण होईल. दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील.



एकाचवेळी नौदलासाठी तीन युद्धसज्ज जहाजांचे राष्ट्रार्पण ही नौदलाच्या इतिहासातील एक मोठी यशोगाथा म्हणावी लागेल. एक विनाशिका, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या गोदीत 'प्रकल्प १५ ब' अंतर्गत चार विनाशिका, 'प्रकल्प १७ अ' अंतर्गत चार फ्रिगेट्स व 'प्रकल्प ७५' अंतर्गत सहा पाणबुड्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार 'प्रकल्प: १५ ब'मधील चौथी व अखेरची विनाशिका, प्रकल्प १७ अ मधील पहिली फ्रिगेट व प्रकल्प ७५ मधील सहावी व अखेरची पाणबुडी एकाचवेळी नौदलाकडून ताफ्यात सामावून घेतली जात आहे.



निलगिरी फ्रिगेट आणि सुरत विनाशिका यांच्यावरुन चेतक, ध्रुव (आधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर), सी किंग, एमएच - ६० आर - सी हॉक ही हेलिकॉप्टर दिवस - रात्र कोणत्याही वेळी उतरू शकतील अथवा उड्डाण करू शकतील. यामुळे या दोन्ही नौकांच्या मदतीने रात्रंदिवस काम करणे शक्य आहे. दोन्ही नौकांवर नौसैनिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची आधुनिक आणि आरामदायी अशी व्यवस्था आहे. महिला नौसैनिकांसाठी या नौकांवर विशेष व्यवस्था आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या शिवालिक श्रेणीच्या निलगिरी फ्रिगेट आणि कोलकाता श्रेणीच्या सुरत विनाशिका या रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या नौकांची रचना खोल समुद्रातही वेगाने हालचाल करण्यासाठीच केली आहे.

कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडीही स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार केली आहे. यामुळे ही पाणबुडी रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या पाणबुडीची संहारक क्षमता मोठी आहे. टॉर्पेडो (पाणतीर), क्षेपणास्त्र, प्रगत सोनार प्रणाली यांच्या मदतीने समुद्रातून समुद्रावर, समुद्रातून जमिनीवर किंवा आकाशात, पाणबुडी विरोधी युद्धात प्रभावी कामगिरी करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे.

नौदलात दाखल होत असलेली सुरत विनाशिका ही कोलकाता श्रेणीची चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. तसेच वाघशीर पाणबुडी ही कलवरी श्रेणीची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. माझगाव गोदीने निलगिरी फ्रिगेट, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी यांची निर्मिती करून आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.

प्रकल्प १५ ब - आयएनएस विशाखापट्टणम श्रेणी - आयएनएस सुरत विनाशिका
प्रकल्प १७ अ - आयएनएस निलगिरी श्रेणी (नवीन श्रेणी या युद्धनौकेपासून सुरू) - आयएनएस निलगिरी फ्रिगेट
प्रकल्प ७५ - आयएनएस कलवरी श्रेणी - आयएनएस वाघशीर

मोदींचा नवी मुंबई दौरा, वाहतूक मार्गात बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार १५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नवी मुंबई येथील खारघरमध्ये इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनासाठी येत आहेत. उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी एक ते दोन तास मंदिरात असतील. या कालावधीत ते मंदिराची आणि तिथल्या व्यवस्थेची पाहणी करतील तसेच इस्कॉनच्या सदस्यांशी संवाद साधतील. मोदींच्या या दौऱ्यामुळे नवी मुंबईत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहे. नागरिकांनी या सूचनांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे; असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने केले आहे.

Comments
Add Comment

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची