'महायुतीत चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही'

मुंबई : आम्हा तिघांच्या महायुतीमध्ये चौथ्या सहकाऱ्याची गरज नसून, शेवटपर्यंत महाराष्ट्रात आमची महायुतीच राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. यामुळे मविआ सोडून उद्धव ठाकरेंचा गट महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.



उद्धव गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, 'काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचे असते. कौतुकांबाबत सतर्क राहायचे असते. अनेकदा राजकारणात फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केले जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत'; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



उद्धव ठाकरे गटाचा भविष्यात महायुतीत समावेश करण्याबाबत विचार होऊ शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर देताना 'आमच्या तीन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. त्यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील'; असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

'आम्हाला मिळालेले पद हे पद नसून, ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकाऱ्याच्या यादीत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे'; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशसेवा आणि समाजसेवा करण्याचे संस्कार लहानपणीच संघाच्या शाखेत जायचो तेव्हा झाले असल्याचे फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा