Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Local Special Trains : मध्य रेल्वेवर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

Mumbai Local Special Trains : मध्य रेल्वेवर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

मुंबई : मध्य रेल्वेच्या वतीने मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना या स्पर्धेत वेळेवर पोहचता यावे यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने रविवार, दि. १९. ०१. २०१५ रोजी २ विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत.



लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे


१. मुख्य मार्ग: कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष


२. विशेष ट्रेन कल्याण येथून ०३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल.


३. हार्बर लाईन: पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष


४. विशेष ट्रेन पनवेल येथून ०३.१० वाजता सुटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल.



या दोन्ही विशेष गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.


स्पर्धक तसेच प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment