खो खो विश्वचषकात भारताचा पुरुष आणि महिला संघ अ गटात आघाडीवर

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत अ गटामध्ये भारताचा पुरुष संघ आघाडीवर आहे. भारताच्या पुरुष संघाने नेपाळ आणि ब्राझिल या दोन्ही संघांविरूद्धचे सामने जिंकले. भारताच्या महिला संघाने दक्षिण कोरियाचा दारुण पराभव केला आणि अ गटात पहिले स्थान पटकावले.



भारताच्या पुरुष संघाने सोमवार १३ जानेवारी रोजी नेपाळ विरुद्धचा सामना ४२ - ३७ असा पाच गुणांच्या फरकाने जिंकला. यानंतर भारताच्या पुरुष संघाने मंगळवार १४ जानेवारी रोजी ब्राझिल विरुद्धचा सामना ६४ - ३४ असा ३० गुणांच्या फरकाने जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकत चार गुण मिळवणाऱ्या भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.



भारताच्या महिला संघाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना १७५ - १८ असा १५७ गुणांच्या फरकाने जिंकला. दक्षिण कोरियाचा दारुण पराभव करत भारताच्या महिला संघाने दोन गुण मिळवले आणि अ गटात पहिले स्थान पटकावले.



भारतीय पुरुष संघाचे उर्वरित साखळी सामने

बुधवार १५ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध पेरू रात्री ८.१५ वा.
गुरुवार १६ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध भूतान रात्री ८.१५ वा.

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

भारतीय महिला संघाचे उर्वरित साखळी सामने

बुधवार १५ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध इराण संध्याकाळी ७ वा.
गुरुवार १६ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध मलेशिया संध्याकाळी ७ वा.

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघ : प्रतिक वायकर(कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो , सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनु, मोनिका, नाझिया बीबी. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.
Comments
Add Comment

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या