Health: थंडीत प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजेत या दोन गोष्टी...आरोग्याला मिळतील खूप फायदे

मुंबई: थंडी आली की घराघरात तिळगुळाचे लाडू बनतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे...


थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या मोसमात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. गूळ आणि तीळ दोन्ही अशा गोष्टी आहेत ज्या थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला पोषण आणि एनर्जी देतात.


तिळामध्ये फायबर आणि गूळामध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे पाचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिळामध्ये झिंक आणि गूळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्याल मदत होते.


तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. तसेच वजनही नियंत्रणात राहते. गूळ आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.


Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे