Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार!

मुंबई : राज्यात ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे.पुढील काही दिवस धुके आणि ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत.उत्तर भारतात पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वेगाने येत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.सध्या राज्यातील तापमानाचा पारा १० अंशांच्याही पुढे गेला आहे.



दोन- तीन दिवसांमध्ये राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.गेले काही राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. सोमवारी (ता. १३) धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात सोमवारी मालेगावात सर्वांत कमी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.पुण्यात १७.१ अंशांवर तापमान होते, तरी पुणेकरांना बोचरी थंडी जाणवत होती.सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र उद्यापासून (ता. १५) तीन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या