Thane : ठाण्यात मालवणी महोत्सवाला खव्वयांची झुंबड!

ठाणे : कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती,लज्जतदार सामिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला...असे सारे काही, अनुभवण्यासाठी विकेण्डच्या सुट्टीला रविवारी ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली. येत्या १९ जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव सुरू असुन ठाणेकरांनी या कोकणच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे.


कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नं.१, शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सवाला सुरूवात झाली. मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणची संस्कृती दर्शविणाऱ्या कौलारू गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणची अनुभूती येते. गणेश मंदिरात कोकणी धाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होत दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात. या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचीही लयलुट सुरू असते.



तसेच, कोकणच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थाची विक्री करणारे महिला बचत गटाचे स्टॉल, तसेच, सुकामेवा, मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, चिकन-वडे, मटण, सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल आहेत. १२ जानेवारी रोजी रविवारचा मुहुर्त साधुन मालवणी महोत्सवात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी मांसाहारी स्टॉलवर खवय्यांची झुंबड उडाली होती. अनेकांनी सहकुटुंब चिकन-मटण आणि मासळीच्या सामिष भोजनाचा आनंद लुटला. तसेच, विविध वस्तु व जिन्नसांची खरेदी करण्याचीही संधी साधली. यावेळी आयोजक सीताराम राणे आणि कोकण ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांची टीम महोत्सवाच्या उत्तम नियोजनाचे काम पार पाडीत आहेत.

Comments
Add Comment

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

अब्जाधीशांच्या यादीत भारताचा प्लास्टिक किंग

नवी दिल्ली : फोर्ब्स ही कायम अब्जाधीशांची यादी जाहीर करतात. या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार

५०० कोटींचे रुग्णालय अजित पवारांच्या भाच्याला?

अंजली दमानिया यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या