Wednesday, January 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजTorres Scam : टोरेस घोटाळा, हजारो तक्रारी दाखल

Torres Scam : टोरेस घोटाळा, हजारो तक्रारी दाखल

मुंबई : झटपट मोठा परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक योजनांचे प्रलोभन टाखवून टोरेस कंपनी व्यवस्थापनाने अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणात टोरेस कंपनी विरोधात तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नागरिकांची रिघ लागली आहे. मुंबईत आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत.

आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

‘टोरेस’ या नावाने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये कारभार सुरू केला. गुंतवणूकदारांना कृत्रिम खडे आणि प्रत्येक आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. सुरुवातीला आकर्षक परतावा मिळाला. पण काही दिवसांपूर्वी परतावा देणे थांबले. सुटी नंतर कामकाज पुन्हा सुरू होईल या आशेवर असलेल्या गुंतवणूकदारांची निराशा झाली. कंपनीला टाळं लावून व्यवस्थापन पसार झाले होते. ही माहिती कानोकानी झाली आणि कंपनीच्या दादर येथील कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली. नंतर अनेक गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेस कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंदवला.

इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांनी संचालक सर्वेश सुर्वे, व्यवस्थापक उझबेकिस्तानी नागरिक तानिया, रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर यांना अटक केली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख ऊर्फ कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवलेंका फरार आहेत. पोलिसांकडून अटकेतील आरोपींची निवासस्थाने आणि ‘टोरेस’च्या सर्व शाखांमध्ये झडती घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत नऊ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

टोरेस कंपनीने मुंबईत दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोर मोक्याच्या जागेवर आलिशान कार्यालय थाटले होते. पण ही जागा दरमहा २५ लाख रुपये या दराने भाडेतत्वावर घेण्यात आली होती. जास्त रकमेची गुंतवणूक करणाऱ्या, तसेच ही गुंतवणूक आणणाऱ्या एजंटना कंपनीने कार भेट म्हणून देण्यास सुरुवात केली होती. या आकर्षक योजनेची माहिती देण्यासाठी कंपनीने कार्यालयात एक कार कायमस्वरुपी ठेवली होती. ही कार दरमहा ११ हजार रुपये भाडेतत्वार घेण्यात आली होती. या व्यतिरिक्त आणखी १४ कारची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या १४ कार कंपनीने ग्राहकांना बक्षिस म्हणून वाटल्या आहेत. या सर्व कार संदर्भात आणखी मिळवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस टोरेस कंपनीच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोरील जागेच्या मूळ मालकाचीही चौकशी करणार आहेत.

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘टोरेस’ कंपनीच्या योजनांमागे युक्रेनच्या नागरिक व्हिक्टोरिया कासातोव्हा आणि ओलेना स्टोयन या प्रमुख आरोपी असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघींनी भारतातून पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांची पथके या दोघींच्या मागावर असून व्हिक्टोरिया, ओलेना, तानिया आणि व्हॅलेंटिना या विदेशी महिलांनी इतर साथीदारांना हाताशी घेऊन फसवणुकीचा हा व्यवसाय सुरू केल्याचेही तपासातून समजले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -