पंतप्रधान सोमवारी जम्मू-काश्मीरला देणार भेट, सोनमर्ग बोगद्याचे करणार उद्घाटन

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी ११:४५ च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सोनमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथील 'झेड-मोर' बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाण्यास मी अतिशय उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुमारे १२ किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा प्रकल्प २७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. यामध्ये ६.४ किमी लांबीचा सोनमर्ग मुख्य बोगदा, एक बहिर्गमन बोगदा आणि जवळचे रस्ते यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून ८६५० फूट उंचीवर असलेला हा बोगदा लेहकडे जाताना श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान सर्व ऋतुंमध्ये संपर्क सुविधा सुकर बनवेल. तसेच भूस्खलन आणि हिमस्खलन या समस्यांना मागे टाकून आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या लडाख प्रदेशात सुरक्षित आणि विनाखंड प्रवास सुनिश्चित करेल. या बोगद्यामुळे सोनमर्गचे वर्षभर पोहचता येणाऱ्या पर्यटन स्थळात रूपांतर होऊन हिवाळी पर्यटन, साहसी खेळ आणि स्थानिक उपजीविकेला चालना मिळेल, परिणामी पर्यटनाला चालना मिळेल.

२०२८ सालापर्यंत पूर्ण होणाऱ्या झोजिला बोगद्यामुळे या मार्गाची लांबी ४९ किमी वरून ४३ किमी पर्यंत कमी होईल तर वाहनाचा वेग ताशी ३० किमी वरून ताशी ७० किमी पर्यंत वाढेल, आणि श्रीनगर खोरे ते लडाख दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर संपर्क सुविधेची अखंडता सुनिश्चित होईल. ही वर्धित संपर्क सुविधा, संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये संरक्षण लॉजिस्टिक्स, आर्थिक वाढ आणि सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेला चालना देईल.

या अभियांत्रिकी साहसिक कार्यातील त्यांच्या योगदानाची नोंद घेत, अत्यंत कठीण परिस्थितीत काळजीपूर्वक काम करणाऱ्या बांधकाम कामगारांनाही पंतप्रधान भेटणार आहेत.

Comments
Add Comment

PM Modi IIT Delhi Convocation : "मी काय बाबा बागेश्वर नाही..."; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचं मिश्कील वक्तव्य

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (IIT Delhi) च्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रमुख पाहुणे

Mecca Defence Pact : पाकिस्तान-सौदी अरेबिया-तुर्की एकत्र! ‘एका देशावर हल्ला म्हणजे तिघांवर हल्ला’; संयुक्त संरक्षण कराराने भारताची चिंता वाढणार?

नवी दिल्ली : पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन महत्त्वाच्या मुस्लिमबहुल देशांनी संरक्षण आणि सुरक्षा

Amarnath Yatra 2026 : खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

जम्मू : खराब हवामान आणि पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता अमरनाथ यात्रा शनिवारी जम्मूमधून

Manipur News : मणिपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; दोन बंदी घातलेल्या संघटनांच्या ४ दहशतवाद्यांना अटक

मणिपूर : मणिपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत दोन बंदी घातलेल्या बंडखोर संघटनांशी संबंधित चार संशयित

NEET Paper Leak : NEET पेपरफुटीचा भांडाफोड! 'CCTVपासून कोऱ्या कागदांपर्यंत...'; पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई; NTAच्या ३ तज्ज्ञांविरुद्ध आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला