झारखंड : झारखंडमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. विद्यार्थिनींनी शाळेच्या कपड्यांवर नाव लिहिल्याने मुख्याध्यापक संतापले. संतापलेल्या मुख्याध्यापकांनी ८० विद्यार्थिनींना शर्टशिवाय ब्लेझरवर घरी पाठवून दिले. या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
धनबाद जिल्ह्यातील खासगी शाळेत दहावीच्या विद्यार्थिनींनी एकमेकींच्या शर्टवर नाव आणि मेसेज लिहिले होते. हा प्रकार कळताच मुख्याध्यापक संतापले. संतापलेल्या मुख्याध्यापकांनी ८० विद्यार्थिनींना गणवेशाचा गैरवापर केल्याप्रकरणी शिक्षा म्हणून शर्टशिवाय ब्लेझरवर घरी पाठवले. जोडपोखर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिगवाडीह इथे ही घटना घडली. संतप्त झालेल्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि मुख्याध्यारकांच्या विरोधात तक्रार केली. पालकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
बीड पुन्हा हादरलं! संतोष देशमुखांनंतर परळीत आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू
काय म्हणाले ८० विद्यार्थिनींचे पालक ??
दहावीचे पेपर संपल्यावर मुलांनी पेन डे साजरा करत एकमेकांच्या कपड्यांवर संदेश लिहिले. हे पाहून मुख्याध्यापक भडकले आणि त्यांनी मुलींना शर्टशिवाय घरी जाण्यास सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.