Khopoli Accident : पाली-खोपोली मार्गावर अज्ञात वाहनाने रिक्षाला उडवले, दोन जण जागीच ठार तर एक गंभीर

खोपोली : पाली-खोपोली मार्गावर आज पहाटे अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Khopoli Accident) झाला. यात रिक्षामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


पाली-खोपोली मार्गावरून कंपनीतून रात्रपाळी करून कामावरून घरी रिक्षा क्रमांक (MH 14 J 4840) ही चालक महेश खरात (रा. कळंब, ता. सुधागड) हे घेऊन जात असताना ते दुरशेत जवळ आले असता अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील रामदास ज्ञानेश्वर घोगरकर आणि अजित हरिश्चन्द्र वाघमारे (रा, घोडपापड जांभूळपाडा) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक महेश खरात हा गंभीर जखमी असल्याने त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



याप्रकरणी पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत. अजित वाघमारे यांची दोन लहान मुले आहेत तर रामदास घोगरकर हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी तपासाची मागणी केली आहे.


या मार्गावर विशेष म्हणजे अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने खोपोली वरून अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या १०८ ॲम्बुलन्स मधून जखमी ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठवले गेले.


दुर्दैवाने या मार्गावर अॅम्ब्युलन्स सेवा तत्काळ उपलब्ध होत नसल्याने वेळेत उपचार भेटत नाहीत, ही शोकांतिका आहे.

Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात