इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : इंग्लंड आणि भारत यांच्यात भारतात पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहेत. अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी, दुसरा सामना २५ जानेवारी, तिसरा सामना २८ जानेवारी, चौथा सामना ३१ जानेवारी आणि पाचवा सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.



भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)



भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका (सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ७ वा. पासून) #T20Series #INDvsENG



बुधवार २२ जानेवारी २०२४ - पहिला सामना - कोलकाता, पश्चिम बंगाल
शनिवार २५ जानेवारी २०२४ - दुसरा सामना - चेन्नई, तामिळनाडू
मंगळवार २८ जानेवारी २०२४ - तिसरा सामना - राजकोट, गुजरात
शुक्रवार ३१ जानेवारी २०२४ - चौथा सामना - पुणे, महाराष्ट्र
रविवार २ फेब्रुवारी २०२४ - पाचवा सामना - मुंबई, महाराष्ट्र
Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ