अमरावती : अमरावती शहरालगत दोन महिला स्वतंत्ररित्या अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहकार विभागाच्या दोन पथकांनी एकाचवेळी धाड टाकून या दोन्ही महिलांच्या ताब्यातील स्टॅम्प पेपर व अन्य दस्तावेज जप्त केले. या प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. अवैध महिला सावकारावर जिल्ह्यात अलीकडे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.
काही दिवसांपूर्वीच मोर्शी सहायक निबंधक कार्यालयात एका तक्रारदाराने मोर्शीत दोन महिला अवैध सावकारी करत असल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे सहकार विभागले दोन पथके तयार केली. या दोन्ही महिला मोर्शी येथे अप्पर वर्धा विभागाच्या – वापरात नसलेल्या शासकीय वसाहतीतून अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने एकाच वेळी दोन्ही महिलांकडे धाड टाकली. त्यावेळी दोन्ही – ठिकाणांहून पथकाला अवैध सावकारी – संबंधित स्टॅम्पपेपर व इतर महत्त्वाचे दस्तावेज मिळून आले. सहकार विभागाच्या पथकाने ते जप्त केले आहेत. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी लेखी व्यवहारापेक्षा तोंडी व्यवहारच अधिक केले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी नेमलेल्या पथक तक्रारदाराने महिला अवैध सावकारी करत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईसाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले. महिला अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई यशस्वी केली. या वेळी पुरुष अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी होते मात्र नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनीच केले. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.
मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका…
मॉस्को : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे.या युद्धात…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन पानिपत : मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे…
प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी)…
मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट…