लग्नाच्या दोन महिन्यांतच केली बायकोची हत्या, नंतर स्वत: केली आत्महत्या

सोलापूर : सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार्जरच्या वायरने बायकोची हत्या करत नवऱ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली. गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) अशी पती पत्नीची नावे आहेत. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी गोपाळ आणि गायत्री यांचा प्रेम विवाह झाला होता. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) यांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झाला होता. आषाढी एकादशी निमित्ताने त्यांचे कुटुंबीय हे कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गायत्री आणि गोपाळ हे दोघे ही मृतावस्थेत आढळून आले.


पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळने असं टोकाचे पाऊल नेमकं का उचललं? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना