नागपूरमध्ये दुर्दैवी घटना: शाळेत मुलाला सोडायला जाताना झाड पडून वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे आज सकाळी एका हृदयद्रावक घटनेत शाळेत मुलाला सोडायला निघालेल्या वडिलांचा झाड पडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून बिसेन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील सतोना बोपेसर मार्गावर ही घटना घडली. जीवचंद यादोराव बिसेन (वय ४६) हे आज सकाळी आपल्या मुलाला चिराग जीवचंद बिसेन (वय १६) याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक MH 35 AP 9370) निघाले होते. तिरोडाकडे जात असताना, सतोना बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि ते झाड थेट रस्त्यावर पडले.

झाड कोसळले त्यावेळी जीवचंद बिसेन यांची दुचाकी नेमकी त्याच्याखालीच होती. काही कळायच्या आतच जीवचंद आणि चिराग यांच्या अंगावर झाड कोसळले. झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. चिराग बिसेन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चिरागला झाडाखालून बाहेर काढले.

चिरागला तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून तिरोड्यात पावसाने हजेरी लावली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम