Amravati News : सावकारगिरी करणाऱ्या अवैध महिलांवर सहकार विभागाची धाड

स्टॅम्प पेपरसह अन्य दस्तऐवज जप्त


अमरावती : अमरावती शहरालगत दोन महिला स्वतंत्ररित्या अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सहकार विभागाकडे प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहकार विभागाच्या दोन पथकांनी एकाचवेळी धाड टाकून या दोन्ही महिलांच्या ताब्यातील स्टॅम्प पेपर व अन्य दस्तावेज जप्त केले. या प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. अवैध महिला सावकारावर जिल्ह्यात अलीकडे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.


काही दिवसांपूर्वीच मोर्शी सहायक निबंधक कार्यालयात एका तक्रारदाराने मोर्शीत दोन महिला अवैध सावकारी करत असल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे सहकार विभागले दोन पथके तयार केली. या दोन्ही महिला मोर्शी येथे अप्पर वर्धा विभागाच्या - वापरात नसलेल्या शासकीय वसाहतीतून अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने एकाच वेळी दोन्ही महिलांकडे धाड टाकली. त्यावेळी दोन्ही - ठिकाणांहून पथकाला अवैध सावकारी - संबंधित स्टॅम्पपेपर व इतर महत्त्वाचे दस्तावेज मिळून आले. सहकार विभागाच्या पथकाने ते जप्त केले आहेत. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.



मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी लेखी व्यवहारापेक्षा तोंडी व्यवहारच अधिक केले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी नेमलेल्या पथक तक्रारदाराने महिला अवैध सावकारी करत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईसाठी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले. महिला अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन ही कारवाई यशस्वी केली. या वेळी पुरुष अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी होते मात्र नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनीच केले. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख स्वाती गुडघे, पथक प्रमुख प्रीती धामणे, सुधीर मानकर, प्रदीप देशमुख, अविनाश महल्ले यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन