Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीसुपरहिट ठरली LICची ही स्कीम...१ महिन्यांत ५००००हून अधिक अर्ज

सुपरहिट ठरली LICची ही स्कीम…१ महिन्यांत ५००००हून अधिक अर्ज

मुंबई: देशातील सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी एलआयसी(LIC) ने नुकतीच लाँच केलेली विमा सखी योजना सुपरहिट झाली आहे. याचा अंदाज तुम्ही या योजनेशी संबंधित जोडल्या गेलेल्या महिलांच्या आकडेवारीवरून घेऊ शकता. या आकड्यावर नजर टाकल्यास एका महिन्यात ५० हजाराहून अधिक महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे. ही योजना सरकारने महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणली होती. यात खास म्हणजे ट्रेनिंगसोबत कमाईही सुरू होते.

पंतप्रधान मोदींनी केली होती लाँच

गेल्या वर्षी ९ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरयाणाच्या पानिपत येथून LIC Bima Sakhi योजना लाँच केली होती. आता त्याला एक महिना पूर्ण झाला आहे. महिन्याभरात या सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ५२,५११ महिलांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे. यात २७ हजाराहून अधिक महिलांच्या संपूर्ण अर्ज प्रक्रियेनंतर नियुक्तिपत्रही पाठवण्यात आले आहे.

ट्रेनिंगसोबत होते कमाई

एलआयसी बिमा सखी योजना अनेक गोष्टींसाठी खास आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात महिलांना ट्रेनिंगसोबत महिन्याला विशिष्ट रक्कमही दिली जाते. LIC Bima Sakhi योजनेमध्ये महिलांना एलआयसी एजंट बनण्याचे संपूर्ण ट्रेनिंग दिले ाते. सोबतच दर महिन्याला ५ हजार ते ७ हजार रूपये दिले जातात. योजनेत ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी ७ हजार रूपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रूपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रूपये मासिक देण्याबाबतचे प्रावधान आहेत. आपले टार्गेट पूर्ण करणाऱ्या महिलांना कमिशन बेस्ड इन्सेंटिव्ह देण्याचीही सुविधा आहे.

ही योजना खास महिलांसाठी आहे. यात सामील होणाऱ्या महिलांना तीन वर्षांसाठी एलआयसी एजंट बनण्याचे ट्रेनिंग दिले जाते. तसेच सुरूवातीपासूनच काही पॉलिसींचे टार्गेट देऊन स्टायपेंड दिला जातो. यासाठी १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. यासाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. मात्र यासाठी काही अटीही आहेत.

असे करू शकता अर्ज

यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अथवा नजीकच्या शाखेत जाऊनही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी महिलेकडे वयाचा दाखला, निवासी दाखला, तसेच १०वी परीक्षा पास झाल्याचे सर्टिफिकेट आणि अटेस्टेड कॉपी असली पाहिजे. अर्ज करताना खरी माहिती भरणे गरजेचे आहे नाहीतर अर्ज रद्द केला जातो.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख

सगळ्यात आधी https://licindia.in/test2 वर जा.
आता पेजच्या खाली क्लिक फॉर बीमा सखीवर क्लिक करा.
अॅप्लिकेशन फॉर्म सुरू होईल. यात माहिती भरा.
त्यानंतर सबमिट करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -