Ratnagiri Sea : रत्नागिरीच्या समुद्रात घडली थरारक घटना!

रत्नागिरी : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर 'वॉच' राहावा, यासाठी काल ( दि. ९ ) ड्रोन प्रणालीचे उद्घाटन केले. अशातच रत्नागिरी समुद्रात बुधवारी ( दि. ८ ) रोजी रात्री उशिरा एका गस्तीनौकेवरील अधिकाऱ्यांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे.


रात्री अकराच्या सुमारास समुद्रात अवैध बोटी असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्तीनौका गोळप-पावस या दिशेने गेली होती. यावेळी हा प्रकार घडला. अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी घेरले व हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली.



यावेळी बोटीतील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. या सगळ्या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेत त्यांनी स्थानिक मच्छीमार व पोलीस कुमक पाठवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


हा सगळा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी जवळ समुद्रात घडला आहे. संबंधित परप्रांतीय नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढची कार्यवाही सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या