Palghar Water Shortage : पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबणार?

  105

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे आमदारांचे आश्वासन


सफाळे : पालघर शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा कृत्रिम पाणीटंचाईचा (Water Shortage) प्रश्न गंभीर बनत चालला असून, यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांनी नुकताच एका बैठकीत दिले. त्यामुळे आता जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महिलांची पाण्यासाठी हाेत असलेली वणवण थांबण्याची शक्यता आहे.



सध्या पालघर भागातील सातपाटी, मोरेकुरण, दापोली, उमरोळी, पंचाळी, पडघे, कमारे, अशा अनेक गावांमध्ये पाण्याचा पुरवठा अपुरा असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गावांना पालघर नगर परिषदेसह २६ गावाला पाणीपुरवठा केला जातो. आज पालघर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे पालघर नगर परिषद क्षेत्रात मोठमोठ्याला इमारती उभ्या होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून त्याचबरोबर या २६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी वाढीव पाण्याची मागणी शासनाकडे करणे आवश्यक आहे. यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी या गावातील सरपंचांनी केल्यावर आमदार गावीत त्यांनी वाढीव पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील पाणीटंचाईमुळे स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


आमदार गावित यांनी या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि जलपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक सोमवारी सहा जानेवारी रोजी पालघर येथे घेण्यात आली. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना राबवण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक गावकऱ्यांनी पाणीवापराचे सुयोग्य नियोजन करण्याचे आवाहन करत, पाणी वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.


"प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा मिळणे हा माझा प्रमुख प्राधान्याचा विषय आहे. या समस्येच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाइपलाइन, जलकुंभ उभारणी, तसेच जलस्रोत व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवण्यात येतील," असे आमदार गावित यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर