श्री स्वामी समर्थच गुरुदत्त

  93

समर्थ कृपा - विलास खानोलकर


पुण्याचे आप्पासाहेब सबनीस ब्रह्मसमंधाच्या बाधेने त्रस्त होते. त्यावर उतारा म्हणून त्यांनी केलेल्या सुरुवातीच्या उपायांचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेरचा उपाय म्हणून गाणगापूरला जाऊन दत्तसेवा करावी, असे त्यांना वाटले. ते वाटणेही साहजिकच आहे. कारण त्यांचे मन रूढीप्रिय, देव-संकल्पनेने भारलेले होते. साधक-बाधक विवेकपूर्ण विचार करण्याच्या ते पलीकडचे होते. आपल्यातील काही लोक या सर्व भाकडकथा समजतात, काही शारीरिक आजार, असेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देतात, पण ती समाधानकारक व गुण आणणारी नसतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रसंगी म्हणजे भूतबाधा-पिशाच्च समंधाच्या वेळी व्यक्तिपरत्वे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशा दोन्ही अंगांनी विचार व्हावयास हवा, असे केल्यास अनेक प्रश्न सद्यःस्थितीत सुटू शकतील.



दत्तसेवेसाठी गाणगापूरला जाण्याचा मनोदय व्यक्त करताच महाराज सबनीसास म्हणाले, ‘जाऊ नका, आम्ही राख रांगोळी करून टाकू.’ यातून श्री स्वामींना हेही सांगावयाचे आहे की, ‘दत्तप्रभू आणि आपण एकच आहोत. आम्ही राखरांगोळी करू, म्हणजे त्यांना असलेल्या पिशाच्चबाधेचा त्रास अक्कलकोटातच नष्ट करण्याचे एक प्रकारे अभिवचन श्री स्वामींनी सबनीसास दिले. लीलेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर पिशाच्च सबनीसास सोडून गेले. खडतर एकनिष्ठेने सेवा केल्याचे फळ सबनीसांना मिळाले. म्हणून हातची स्वामी सेवा सोडून इतरांच्या मागे लागण्यात काय अर्थ?’


सबनीसासंबंधीच्या लीला कथेतून काय घेता येईल? काय शिकता येईल? थोडीशीच नगण्य उपासना करून परमेश्वराकडून खूप अपेक्षा करणे चुकीचे आहे. ‘श्री स्वामी समर्थांना’ अपेक्षित असलेली उपासना जाणत्याकडून माहीत करून घ्यावयास हवी. काल सुसंगत उपासना करणे, केव्हाही सोयीचे असते. नाही तर अनेकदा ‘जखम डोक्याला बँडेज पायाला’ असे होते. अशा उपासनेतून श्रम-वेळ-पैसा वाया जातो, हाताला फारसे काही लागत नाही. तेव्हा उपासनेतही सद्सद्विवेक शुद्ध-निर्मळ आणि सरळ आचार-विचार आणि व्यवहार अपेक्षित आहे. उपासनेत सातत्य आणि वेळ याचा सुयोग्य मेळ असावा, श्रद्धा आणि सबुरी असावी, हाच इथला अर्थबोध आहे.


कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन:शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा, त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच, विचार ही एक विलक्षणशक्ती
असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे ‘नशीब’ बदलेल.

Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: सूर्य-शनी युतीमुळे 'या' ५ राशींना मिळेल विशेष लाभ!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. २०२५ मध्ये रक्षाबंधनाच्या

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १