Lucky Draw : ऑनलाईन वीज बिल भरा आणि बक्षिसे मिळवा

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना


मुंबई : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना (Lucky Draw) सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीन पेक्षा अधिक वीजबिले भरून ग्राहकांना योजनेच्या लाभाची संधी साधता येणार आहे. कल्याण आणि भांडुप परिमंडलातील जवळपास ८० टक्के ग्राहक डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरतात. उर्वरित २० टक्के ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.


०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी ड्रॉ व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. रांगेत उभे राहून वेळ, श्रम व पैशांचा अपव्यय करण्याऐवजी महावितरणच्या उपलब्ध संकेतस्थळ, मोबाईल ॲप व इतर सुविधांमार्फत ऑनलाईन वीजबिल भरून ग्राहक ०.२५ टक्क्यांची सवलतही मिळवू शकतात.



महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक महिने वीजबिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत