

तुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून ...
महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज येथे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. साधुसंतांच्या मिरवणुका तसेच वेगवेगळ्या आखाड्यांचे साधुसंत आणि त्यांच्या अनोख्या परंपरा बघण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. नागा साधुंना बघण्याची संधीही नागरिकांना लाभणार आहे.

Parenting Tips: मुलांना वयाच्या १३व्या वर्षाच्या आधी शिकवा या ८ गोष्टी
मुंबई: मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्यांना जसा आकार देणार तसे ते घडतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांबाबत सजग असले ...
महाकुंभ मेळा २०२५ - शाही स्नानाच्या तारखा
मंगळवार १४ जानेवारी २०२५ - मकरसंक्रांत
बुधवार २९ जानेवारी २०२५ - मौनी अमावस्या
सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ - बसंत पंचमी (वसंत पंचमी)

Facebook Instagram News : Facebook, Instagram चालवण्यासाठी लागणार परवानगी; सरकारची नवीन योजना काय?
मुंबई : देशामध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे ...
महाकुंभ मेळा २०२५ - सामान्य स्नानाच्या तारखा
सोमवार १३ जानेवारी २०२५ - पौष पौर्णिमा
बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ - माघ पौर्णिमा
बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ - महाशिवरात्र
भारतातील चार महत्त्वाची तीर्थक्षेत्र
भारतात चार महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेश येथे उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या पात्रात कुंभमेळा होतो. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे संगमावर तसेच हरिद्वार येथे गंगा नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रत्येकवेळी ४५ दिवसांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन करतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने धार्मिक प्रदर्शनांचे तसेच धार्मिक चर्चासत्रांचे आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. वेद, चरक संहिता, पुराण आणि ज्योतिषशास्त्र या विषयांशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदा प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या ठिकाणी किमान एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनच्या मदतीने २४ तास लक्ष ठेवले जाईल. बंदोबस्तासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलीस यांची नियुक्ती केली जाईल. हर्षवर्धन तिराहा (तीन मार्ग जिथे एकत्र येतात ते ठिकाण), काली मार्ग, जीटी जवाहर आणि बांगड चौराहा (चौक किंवा चार मार्ग जिथे एकत्र येतात ते ठिकाण)