Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीतुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान

तुमच्या यशामध्ये अडथळे ठरतात हे ३ प्रकारचे लोक, नेहमी करतात नुकसान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की काही लोकांमुळे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते या लोकांपासून दूर राहिले तरच व्यक्तीच्या प्रगतीसाठी चांगले आहे. नाहीतर ते नुकसानदायक ठरू शकते.

आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांची संगत धरू नये. जे स्वत:लाच मोठे शहाणे समजतात ते लोक मूर्ख असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख लोक कितीही जवळचे असले तरी नेहमी आपला वेळ खराब करतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख लोकांचे चुकीचे निर्णय नेहमीच इतर माणसांसाठी भारी पडू शकतात. तसेच मूर्खांपासून दूर राहिलेलेच बरे.

प्रत्येक वेळेस रडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक शोधणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यापासून दूर राहिले पाहिजे.

चाणक्य यांच्यानुसार काही काळात त्यांचे विचारही या लोकांप्रमाणेच नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या महिला खुद्द स्वत:ला सर्वोपरि समजतात त्यांच्यापासूनही दूर राहिले पाहिजे. स्वत:ला सर्वतोपरी समजणाऱ्या महिला खोटे बोलतात आणि कडवट शब्दांचा वापर करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -