Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीParenting Tips: मुलांना वयाच्या १३व्या वर्षाच्या आधी शिकवा या ८ गोष्टी

Parenting Tips: मुलांना वयाच्या १३व्या वर्षाच्या आधी शिकवा या ८ गोष्टी

मुंबई: मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्यांना जसा आकार देणार तसे ते घडतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांबाबत सजग असले पाहिजे. त्यांना योग्य वयात योग्य त्या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत.

लहान मुलांना टीनएज म्हणजेच वयाच्या १३व्या वर्षा आधी काही गोष्टी शिकवायलाच हव्यात ज्यामुळे जीवनात त्यांना पुढे उपयोगी ठरतील . तसेच त्यांना प्रत्येक पायरीवर यशस्वी होता येईल आणि अपयश हाती आले तर हिंमत न हरता आणखी मेहनत करावी लागेल हे शिकवावे लागेल.

आम्ही अशा ८ गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या लहान मुलांना शिकवू शकता.

आपली रूम स्वच्छ करणे

आपली रूम ही स्वच्छ ठेवली पाहिजे हे लहानपणापासून मुलांना शिकवले पाहिजे. यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. तसेच बेड व्यवस्थित करणे, गोष्टी साफ करणे तसेच रूम स्वच्छ करणे शिकले पाहिजे.

कपडे धुणे

छोट्यामुलांना वॉशिंग मशीनचा वापर कसा करायचा हे शिकवावे. कपडे धुताना त्यांची मदत घ्या तसेच हळू-हळू स्वत:चे कपडे स्वत: धुवायला शिकवा. तसेच सुकलेले कपडेही घडी घालायला लावा.

सोपे कुकिंग

आपल्या मुलांना सँडविच, अंडी, भात सारख्या सोप्या गोष्टी शिकवा. यामुळे मुलांमध्ये विश्वास वाढतो. तसेच आपली काळजी कशी घ्यावी हे ही समजते.

भांडी घासणे

मुलांना भांडी घासायलाही शिकवा. कमीत कमी मुले ज्या प्लेटमध्ये खात आहेत ती त्यांना धुवायला शिकवा. यामुळे मुलांना स्वत:ची कामे स्वत: करायची सवय लागेल.

कचरा न करणे

अनेक मुलांना सवय असते की ते कचरा करतात. त्यामुळे मुलांना आधीपासूनच सवय लावा की कचरा केला तर तो कचरापेटीत टाकावा. रस्त्यावर तसेच घरात इतरत्र तो फेकू नये.

योग्य पद्धतीने पैसे खर्च करणे

मुलांना पैशाचे महत्त्व समजून द्या तसेच पैसे योग्य पद्धतीने कसे खर्च करावेत हे ही शिकवा.त्यांना पॉकेटमनी द्या आणि त्यांना शिकवा की पॉकेटमनी कुठे आणि कसा खर्च केला पाहिजे.

छोटी छोटी कामे करायला लावा

मुलांना झाडांना पाणी देणे, स्क्रू टाईट करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा. यामुळे त्यांना कामाची सवय लागेल.

टाईम मॅनेजमेंट

मुलांना टाईम मॅनेजमेंटही शिकवा. यामुळे ते वेळेत आपली कामे पूर्ण करू शकतील. तसेच डेडलाईन पूर्ण करण्यास शिकवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -