Investment: SBI 'या' स्कीमने तुम्ही बनू शकता लखपती

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआयने(SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवी स्कीम सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे 'हर घर लखपती'. ही एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD स्कीम आहे. याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला छोटी-छोटी बचत करत मोठा फंड तयार करू शकता. यात वरिष्ठ नागरिकांना अधिक फायदा होणार आहे कारण सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा त्यांना अधिक व्याज मिळणार आहे.



लहान बचत आणि मोठा फंड


ही स्कीन त्या गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे जे दर महिन्याला एक निश्चित रक्कम या 'हर घर लखपती' योजनेच्या आरडी खात्यात जमा करून मोठा फंड बनवू शकतात. या आरडी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ३ ते १० वर्षे आहे. याचा अर्थ एसबीआयच्या या योजनेत गुंतवणूकदार ३ वर्षाच्या कालावधीपासून ते १० वर्षाच्या कालावधीपर्यंत पैसे गुंतवू शकतात. छोटी छोटी बचत केल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.



१० वर्षांच्या मुलांचेही खोलू शकता खाते


'हर घर लखपती' या योजनेत खाते सुरू करण्यासाठीच्या वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास मुलांपासून ते वरिष्ठ नागरिकही यात खाते खोलू शकतात. १० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाची मुलेही यात खाते खोलू शकतात.



७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज


एसबीआयच्या या स्पेशल आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास ते ग्राहक आणि मॅच्युरिटी पीरियडच्या हिशेबाने वेगवेगळे आहे. सामान्य गुंतवणूकदारांना यात ६.७५ टक्के व्याजदर ऑफर केले जात आहे तर वरिष्ठ नागरिकांना 'हर घर लखपती' या योजनेत गुंतवणुकीसाठी ७.२५ टक्के व्याजदर मिळत आहे. एसबीआयचे कर्मचारी यात गुंतवणूक करत असतील तर त्यांना ८ टक्के व्याजदर मिळत आहे.



हफ्ता चुकल्यास किती दंड?


जर दर महिन्याला खात्यात जमा होणारा हफ्ता लेट झाला तर त्यासाठी दंडही आहे. यात १०० रूपयांवर १.५० ते २ रूपयांचा दंड आहे. तर एखाद्या गुंतवणूकदाराने सलग ६ महिने या खात्यात पैसे भरले नाहीत तर त्याचे अकाऊंट बंद करून जमा झालेली रक्कम त्याच्या बचत खात्यावर ट्रान्सफर केली जाईल.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम