Mukkam Post Devach Ghar : 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा टीजर लाँच! 

मुंबई : देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असतं? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच लाँच (Teaser Launch) करण्यात आला असून हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (Mukkam Post Devach Ghar)



आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवालाही पत्र पोहोचेल अशा अनोख्या कल्पनेतून सुरू होणाऱ्या टीजरमुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" मनाला भिडणारी गोष्ट नक्कीच सांगणार असल्याचा अंदाज देतो. एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल याचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. तसेच दरम्यान तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जोडही देण्यात आली आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटुंब हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे "मुक्काम पोस्ट देवाचं घर" हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीपासून चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा यात शंका नाही.


मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. मायराचा अवखळ अंदाज सविता मालपेकर आणि उषा नाडकर्णी यांची खमंग फोडणी त्याला प्रथमेश परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, रेशम श्रीवर्धन यांची भक्कम साथ असल्यामुळे सहकुटुंब प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी मिळणार आहे. (Mukkam Post Devach Ghar)
Comments
Add Comment

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री