Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीRajdhani Express : राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन!

Rajdhani Express : राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन!

वंदे भारत, शताब्दी टॉप ५ मधून बाहेर

मुंबई : भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) गाड्यांमध्ये दररोज करोडो लोक प्रवास करतात. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतात दररोज हजारो गाड्या रुळांवर धावतात. राजधानी (Rajdhani Express), शताब्दी (Shatabdi), दुरांतो (Duronto), वंदे भारत (Vande Bharat) या सुपरफास्ट ट्रेन व्यतिरिक्त, मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर ट्रेन, लोकल, डीएमयू अशा अनेक ट्रेन्स आहेत. सध्या प्रवासी रेल्वेमध्ये वंदे भारत या ट्रेनचा बोलबाला असला तरी उत्पन्नाच्या बाबतीत राजधानी एक्स्प्रेसने देशातील सर्वच रेल्वेंना पिछाडीवर टाकले आहे.

Shivsena UBT Pune : पुण्यातून उबाठा गटाला धक्का! पाच माजी नगरसेवक करणार भाजपामध्ये प्रवेश

भारतीय रेल्वे प्रवासी तिकीट व मालवाहतुकीतून पैसे कमवते. यासाठी प्रत्येक ट्रेनची स्वतःची खासियत असते. कोणत्या ट्रेनला सर्वाधिक कमाई होते? म्हणजेच भारतीय रेल्वेची कोणती ट्रेन ‘धनलक्ष्मी’ आहे? जर तुम्ही असा विचार करत असाल की वंदे भारत किंवा शताब्दी एक्स्प्रेस रेल्वेच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या गाड्यांपैकी एक आहेत, तर तुम्ही चुकीचे आहात, तर उत्तर रेल्वेची सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस नसून राजधानी एक्स्प्रेस आहे.

सियालदह राजधानी एक्स्प्रेस कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमाकांवर

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीशी जोडणारी सियालदह राजधानी एक्स्प्रेस ही रेल्वेची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन आहे. ट्रेन क्रमांक १२३१४ सियालदह राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ मध्ये ५,०९,१६४ लोकांना त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवले, ज्यामुळे या ट्रेनची कमाई १,२८,८१,६९,२७४ रुपयांवर पोहोचली. या यादीत दिब्रुगडची राजधानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने गेल्या वर्षी ४,७४,६०५ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवले होते. यामुळे रेल्वेला एकूण १,२६,२९,०९,६९७ रुपयांची कमाई झाली होती.

राजधानी एक्स्प्रेस कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमाकांवर 

नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी राजधानी एक्स्प्रेस सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ ट्रेनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ट्रेन क्रमांक १२९५२ मुंबई राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ मध्ये ४,८५,७९४ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले होते, ज्यामुळे रेल्वेच्या खात्यात १,२२,८४,५१,५५४ रुपये आले. दिब्रुगड राजधानी या ट्रेनने गेल्या वर्षी ४,२०,२१५ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले आहे. या ट्रेनने १,१६,८८,३९,७६९ रुपये कमावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -