वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो !

  95

डोंबिवली: जळगाव येथे वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याने हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. ही बाब जर चुकून झाली असेल तर ठीक मात्र जर हेतुपरस्पर घडत असेल तर संबधीतांवर शासन म्हणून कारवाई करण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.


रविवारी भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात करण्यात आली त्यावेळी आमदार चव्हाण यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले.

अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले अशी माहितीही त्यांनी दिली. जळगावात महावितरण कंपनीच्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहकांमध्ये चर्चा होत आहे.

भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराघरात जाऊन प्राथमिक सदस्य अभियानाची सुरुवात करा असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर रविवारी डोंबिवलीत सदर अभियानाची सुरुवात झाली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे. महायुती सरकार आल्यानंतर चांगलं वातावरण आहे. तरुण-तरुणींचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे सात ते दहा तारखेपर्यंत महाविद्यालयाच्या बाहेर कॅम्प लावण्यात येणार आहेत. 18 ते 24 वर्ष वयोगटापर्यंत 25 लाखाहुन अधिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Maharashtra Rain Updates: कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा, तर पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात मुसळधार मुंबई : कोकण किनारपट्टीला भारतीय

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

Pandharpur : पंढरपुरात दुर्घटना! चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू...

पंढरपूर : पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी (दि.२०) चंद्रभागा नदीत एक दुर्घटना घडली.

Ashadhi Wari 2025 : वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप!

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. येत्या

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न, जळगावात खळबळ

जळगावमध्ये एका व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगाव:

कोल्हापूरच्या स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार, सीसीटीव्ही फुटेजमुळे उडाली खळबळ 

कोल्हापुर: राज्यातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीत दिवसाढवळ्या भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला