मुंबई : रेल्वे प्रशासन (Railway Administration) रेल्वेची अभियांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. तसेच नववर्षातील आज पहिलाच रविवार असून आजही मुंबईतील उपनगरीय रेल्वे (Mumbai Local) मार्गांपैकी तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
हार्बर मार्गावर (Harbour Line) आज पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटं ते दुपारी ४ वाजून ५ मिनिट असे पाच तासाच्या कालावधीचा मेगाब्लॉक असणार आहे.
दरम्यान यावेळी सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील आणि पनवेल बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा बंद असतील. तसेच पनवेल ते ठाणे मार्गावरील अप-डाऊन सेवा बंद आहेत. तर सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
आज पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० वाजून २५ मिनिट ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असा पाच तास मेगाब्लॉक असणार आहे.
यावेळी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. तसेच ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही सेवा चर्चगेटपासून वांद्रे आणि दादरपर्यंत धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर (Central Railway) माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
यावेळी सीएसएमटीहून डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यानंतर मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. त्याचबरोबर ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड व माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…