Bhoot Bangla : बॉलिवूडचा खिलाडी दिसणार जुन्या अंदाजात! अक्षय कुमारच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

  69

'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : नववर्ष सुरु झाले असून मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) अनेक नवनवीन चित्रपटाची घोषणा होत आहे. अशातच अक्षय कुमार (Akshay Kumar) कडूनही आनंदाची बातमी मिळाली आहे. अक्षय कुमारचे चाहत्यांना बॉलिवूडचा खिलाडी पुन्हा जुन्या अंदाजात दिसणार आहे. अक्षय आणि प्रियदर्शनची अप्रतिम जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाली आहे. हे दोघेही ''भूत बांगला'' (Bhoot Bangla) या हॉरर कॉमेडी चित्रपटातून एकत्र येत आहेत. तसेच या चित्रपटाचे शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची रिलीज तारीख देखील समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबईत शूटिंग सुरू केल्यानंतर, टीम आता पिंक सिटीमध्ये या हॉरर-कॉमेडीच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग करत आहे. तसेच भूत बंगला २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


दरम्यान, हा चित्रपट शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस 'केप ऑफ गुड फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, फरा शेख आणि वेदांत बाली हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच चित्रपटाची कथा आकाश ए कौशिक यांनी लिहिली आहे, तर पटकथा रोहन शंकर, अभिलाश नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केली आहे. या चित्रपटाचे संवाद रोहन शंकर यांनी लिहिले आहेत.

Comments
Add Comment

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात

Shefali Jariwala Death: ज्याचा विचार करत होती, त्याच्यासारखेच मरण आलं! शेफालीची 'ती' पोस्ट व्हायरल

EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल  'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या